Sonali Kulkarni: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिच्या फोटोंवर नेटकरी देखील विविध कमेंट करताना दिसतात. अनेकदा तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. परंतु ट्रोल करणाऱ्याला ती सडेतोड उत्तर देतानाही दिसते. आता पुन्हा एकदा सोनालीने एका नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिलं आहे.
सध्या सोनालीचे बालीचे फोटो आणि व्हिडीओ खूप चर्चेत आले आहेत. एका व्हिडीओमधून सोनाली बालीमधील हिंदू संस्कृतीविषयी चाहत्यांना माहिती देताना दिसत आहे. सोनालीच्या एका पोस्टवर पूनम पाटील पांडव नावाच्या युजरने प्रतिक्रिया देत लिहिलं की, ‘बिचारा नवरा एकही फोटो नाही त्याचा.’ या युजरला सडेतोड उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, “त्याची मर्जी, तुम्हाला का त्रास होतोय एवढा?” याआधीही सोनालीला तिच्या बऱ्याच पोस्टवर नवऱ्याविषयी विचारलं गेले होते. तेव्हा देखील अभिनेत्रीने युजर्सना चांगलंच उत्तर दिलं होतं.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी सोनालीने शेअर केलेल्या एका फोटोवर चाहतीने तिला एक सल्ला दिला आहे. सोनालीची चाहती म्हणाली, ‘काही पण कर बिग बॉसमध्ये नवऱ्याबरोबर जाऊ नकोस.’ यावर सोनाली म्हणाली की, ‘एकटी पण जाणार नाही कधीच.’ सोनाली दिलेले हे उत्तर अनेकांना आवडले होते. दरम्यान, सोनाली लवकरच मल्याळम चित्रपटात झळकणार आहे. ‘मलाइकोट्टई वालीबान’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच ती दाक्षिणात्य चित्रपटात काम करताना दिसणार आहे.