म्हणून “ऍपल’चे स्मार्टफोन असतात कॉस्टली

ब्रॅंडची किंमत मोजावीच लागेल

सध्या संपूर्ण जग स्मार्टफोनने व्यापलेले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. अँड्रॉईड फोनबरोबरच आयफोनची क्रेझ देखील नाकारली जाऊ शकत नाही. अँड्रॉईड फोन सर्वसामान्यांना परवडणारे असतात तर आयफोन घेण्यासाठी खूप पैसा खर्च होतो. मात्र, आपला एक वर्ग आणि दर्जा राखणाऱ्या ऍपलचा आयफोन इतका महाग का असतो, याची कारणे जाणून घेणे रंजक आणि माहितीपूर्ण ठरेल.

जर आपण 2016 बद्दल बोललो तर आयफोन 7 ची किंमत 649 अमेरिकन डॉलरपासून सुरू झाली. अवघ्या तीन वर्षांनंतर, ऍपलच्या नवीनतम फ्लॅगशिप आयफोनची किंमत त्यापेक्षा 54 टक्के जास्त आहे, आणि ती मॅक मिनीपेक्षा अधिक आहे. ऍपल जेव्हा आपले नवीन मॉडेल जाहीर करते, तेव्हा किंमतीत 60 टक्‍क्‍यांनी वाढ केली जाते. या किंमती ऍपलसाठी प्रचंड नफा आणतात. अमेरिकेची पहिली ट्रिलियन डॉलरची कंपनी म्हणून ऍपलची बाजारपेठ स्वित्झर्लंडच्या जीडीपीपेक्षा अधिक आहे. आयफोनची किंमत त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूप जास्त का आहे यामागील ही सात कारणे जाणून घ्या .

1. ब्रॅंड निष्ठा
जर आपण उद्योगातील तज्ञांशी बोललो तर बऱ्याच वर्षांत ऍपलने आपल्या उत्पादनांच्या गुणवत्तेसाठी आणि औद्योगिक डिझाइनसाठी एक वेगळी प्रतिष्ठा स्थापित केली आहे. या प्रतिष्ठेमुळे कंपनीने कोट्यावधी निष्ठावंत ग्राहक तयार केले आहेत. ग्राहकांची या ब्रॅण्डसोबत निष्ठा एक प्रीमियम बनते, ज्यामुळे ग्राहक ऍपलशिवाय दुसरा फोन घेण्यास तयार नसतात.

2. ऍपल कर निष्ठा
हे प्रीमियम ऍपल टॅक्‍स म्हणून देखील ओळखले जाऊ शकते. म्हणजेच आयफोनसाठी अधिक पैसे खर्च केले जातात कारण ते ऍपल उत्पादन आहे. चला याचं एक उदाहरण घेऊ. उदाहरणार्थ, 256 जीबी मॅकबुक एयरची किंमत 1,299 अमेरिकन डॉलर आहे. गंमत म्हणजे, आपण 100 डॉलरपेक्षा कमी किंमतीत अधिक शक्तिशाली विंडोज लॅपटॉप खरेदी करू शकता. जून 2019 मध्ये, कंपनीने मॅक प्रोची घोषणा केली आणि 5,000 डॉलरच्या मॅक प्रो डिस्प्लेसाठी अतिरिक्त (ऍड-ऑन) म्हणून एक 1000 डॉलरचे मॉनिटर स्टॅंड स्वतंत्रपणे सादर केले.

3. मर्यादित मेमरी
ऍपल जे काही करते ते वेगळेच असते. म्हणजेच, जेव्हा आपण आयफोन खरेदी करता तेव्हा आपण स्वतंत्रपणे मेमरी क्षमता वाढवू शकत नाही. याचा अर्थ असा की आपण त्यात मेमरी कार्ड टाकून त्याचे अंतर्गत संग्रह वाढवू इच्छित असाल तर ते शक्‍य नाही. अशा परिस्थितीत आपल्याला अधिक स्टोरेजची आवश्‍यकता असल्यास आपणास अधिक ऍपल कर भरावा लागेल, म्हणजे आपल्याला अधिक पैसे द्यावे लागतील.

4. दमदार फीचर्स
ऍपल आयफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स असतात. आयएलफोनमध्ये ओएलईडी डिस्प्ले, वेगवान प्रोसेसर आणि थिनर बेझलसह अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये जोडली गेली आहेत, परंतु बाजारात उपलब्ध असलेल्या त्याच्या प्रतिस्पर्धी स्मार्टफोनमध्येही अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत.

5. उत्पादन खर्चापेक्षा दुप्पट किंमत
तज्ञांच्या मते, आयफोन तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यांची किंमत सुमारे 490 डॉलर आहे, तर या फोनची किंमत 1,099 डॉलर ठेवण्यात आली आहे. आपण सॅमसंगच्या गॅलेक्‍सी एस 10 प्लसशी तुलना केल्यास त्याची किंमत 999 डॉलर आहे, तर त्याची उत्पादन किंमत 420 डॉलरपेक्षा कमी आहे.

6. ब्रॅंडची किंमत मोजावीच लागेल
जेव्हा ऍपलने आयफोन 10 लॉन्च केला तेव्हा बरेच बदल झाले. ते नुसते अधिक महागच नव्हते, तर त्याची किंमत आणि किरकोळ किंमत यांच्यातही फरक होता. ऍपलला नफा मिळवायचा आहे, म्हणून त्याची उत्पादन किंमत त्याच्या बाजारातील किंमतीपेक्षा खूपच कमी असावी. ऍपलला खास बनवणारी गोष्ट म्हणजे तिची प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मोठा नफा कमावण्याची क्षमता. जेव्हा ऍपलचा विचार केला जातो तेव्हा तंत्रज्ञान कंपनीऐवजी लक्‍झरी ब्रॅंड म्हणून पाहिले पाहिजे.

7. प्रीमियम हार्डवेअर
ऍपल आयफोनचे डिझाइन उत्कृष्ट आहे, हार्डवेअर वेगवान आणि नवीनतम आहे. त्यामुळे फोन ऑपरेट करणे अत्यंत सोपे आणि अत्यंत वेगवान आहे. उद्योग तज्ञांचा असा विश्वास आहे की कंपनी प्रीमियम हार्डवेअर तयार करते आणि लोक एका सोप्या आणि उत्कृष्ट अनुभवासाठी अधिक पैसे देण्यास तयार असतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.