Google Chrome Users Alert: तुम्ही देखील Google Chrome ब्राउझर वापरता का? जर होय, तर काळजी घ्या. कारण भारत सरकारने उच्च जोखमीचा इशारा जारी केला आहे. यामध्ये युजर्सच्या डेटाला धोका निर्माण झाला आहे. खरं तर, भारताच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-in) ने Google Chrome ब्राउझर वापरकर्त्यांना वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याच्या जोखमीबद्दल सतर्क केले आहे. अशा परिस्थितीत युजर्सची बँक माहिती देखील चोरीला जाऊ शकते आणि बँक खाते देखील रिकामे होऊ शकते. तुम्ही तुमचा डेटा कसा सुरक्षित ठेवू शकता याबाबत जाणून घ्या.
CERT-in नुसार, हॅकर्स Google Chrome वेब ब्राउझर वापरकर्त्यांचा डेटा चोरू शकतात. एका अहवालात असे म्हटले आहे की, त्याच्या काही आवृत्त्यांमध्ये अनेक गंभीर सुरक्षा त्रुटी आहेत. याचा फायदा घेऊन हॅकर्स तुमचा डेटा चोरू शकतात. तथापि, हॅकर्सपासून तुमचे डिव्हाइस संरक्षित करण्यासाठी तुम्ही Google Chrome अपडेट करू शकता.
Google Chrome च्या कोणत्या आवृत्त्या प्रभावित आहेत?
– Mac साठी 123.0.6312.122/.123/.124 पूर्वीच्या Google Chrome आवृत्त्या
– Windows साठी 123.0.6312.122/.123 पूर्वीच्या Google Chrome आवृत्त्या
– Linux साठी 123.0.6312.122 पूर्वीच्या Google Chrome आवृत्त्या
गुगल क्रोम अपडेट कसे करायचे ?
– तुमच्या डेस्कटॉपवर Google Chrome उघडा.
– यानंतर तुम्हाला वरच्या उजव्या कोपऱ्यात तीन ठिपके दिसतील.
– या ठिपक्यांवर क्लिक करून मेनू उघडा.
– आता मेनू उघडल्यानंतर तुम्हाला एक मदत (Help) पर्याय दिसेल.
– यानंतर तुम्हाला खाली जावे लागेल, तेथे सबमेनूमध्ये About Google Chrome दिसेल.
– या पर्यायावर टॅब केल्यानंतर, अपडेट तुम्हाला आपोआप दाखवले जाईल.
– जर नवीन अपडेट असेल तर त्यावर क्लिक करून अपडेट करता येईल.
– आता “रीलाँच” बटण दाबा आणि अशा प्रकारे Chrome नवीन आवृत्तीवर अपडेट केले जाईल.