मुंबई – शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार आलं. यानंतर शिवसेनेने न्यायालयात दाद मागत आमदारांवर अपात्रतेची मागणी केली होती. मात्र यानंतर सर्वोच्च न्ययालयात तारिक पे तारिकचा सिलसिला सुरु झाला. निवडणूक चिन्हासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीला स्थगिती देऊ नये’, असा अर्ज मंगळवारी (६ सप्टेंबर) शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला. त्यावर, आज (७ सप्टेंबर) तातडीने सुनावणी घेण्यात आली.
यावेळी घटनापीठाने २७ सप्टेंबरला या प्रकरणी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून निर्णय देऊ असं स्पष्ट केलं. तसेच निवडणूक आयोगाला २७ सप्टेंबरपर्यंत या प्रकरणात कोणताही निर्णय घेऊ नये, असं निर्देश दिले.
यावेळी सुनावणीमध्ये ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवा अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलांकडून न्यायालयात करण्यात आली. तर न्यायालयाने ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांना तुमचे म्हणणे एकूण घेऊ असे म्हणत पुढील सुनावणीसाठी २७ सप्टेंबर ही तारीख दिली. त्यामुळे आता पुढील सुनावणी २७ सप्टेंबरला होणार आहे.आमदारांच्या अपात्रतेबाबत १० मिनटं ऐकून घेऊ असे देखील यावेळी न्यायालयाने म्हंटले. तीन पक्षकारांना ३ पेजमध्ये रिप्लाय फाईल करण्याचे आदेश देखील यावेळी देण्यात आल्याचे समजते.
सविस्तर वृत्त थोड्या वेळात…