WHOकडून १३३ देशांना मिळणार कमी किंमतीची करोना टेस्ट किट; मूल्य असेल केवळ इतकेच

नवी दिल्ली – जगभरात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच असून यामुळे लाखो नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. अशातच करोना टेस्ट मोठ्या प्रमाणावर होण्याची गरज सातत्याने वर्तवली जात आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) एका नवीन रॅपिड अँटिजेन किटला मंजुरी दिली आहे. या किटमुळे काही मिनिटातच करोना बाधित आहे कि नाही हे कळणार आहे.

या टेस्ट किटबद्दल डब्लूएचओचे प्रमुख टैड्रॉस एडहेनॉम घेबरेयेसस म्हणाले कि, १२ कोटी टेस्ट किट ६ महिन्यांच्या आता तयार करण्यात येईल. या सर्व टेस्ट किट्स संघटनेच्या भागीदारांसोबत बनवण्यात येईल आणि ११३ देशांमध्ये उपलब्ध केले जातील. याची किंमत ५ डॉलर म्हणजेच भारतीय चलनांमध्ये ४०० रुपयांपेक्षाही कमी आहे.

या किटमुळे कमी किंमतीत विश्वासार्ह परिणाम समोर येतील. तसेच काही  तासांऐवजी १५ ते ३० मिनिटात रुग्णांचा अहवाल समजेल. यामुळे संक्रमण थांबविण्यास मदत होईल, असेही डब्लूएचओने सांगितले.

अनेक देशांमध्ये टेस्टची किंमत अधिक असल्याने चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. या नवीन किटमुळे अधिकाधिक चाचण्या होण्याची आशा डब्लूएचओने व्यक्त केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.