एकीकडे अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे, तर दुसरीकडे सर्वांच्या नजरा तिचा बेस्ट फ्रेंड ओरहान अवतारमणी उर्फ ओरीवर खिळल्या आहेत.
ओरहान अवतारमणी अनेकदा स्टार मुलींसोबत पार्टी करताना दिसतो. तो जान्हवी कपूरचा चांगला मित्र आहे. एकेकाळी ओरहानचे नाव जान्हवी कपूरसोबत जोडले गेले होते.
आजकाल ओरी न्यासा देवगणसोबत मस्ती करताना दिसत आहे. न्यासाच्या सर्व पार्ट्यांमध्ये ओरहान तिच्या हातात हात घालून दिसतो.
ओरीचे स्टार किड्ससोबतचे फोटो पाहून चाहतेही गोंधळले आहेत. तो न्यासा देवगण आहे की जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड आहे की दोघांचा फक्त चांगला मित्र आहे हे समजू शकलेले नाही.
ओरहान अवतारमणी हा एका व्यावसायिकाचा मुलगा आहे. तो स्टार किड्सच्या खास मित्रांपैकी आहेत. ओरहान मोठ्या स्टार्ससोबत पार्ट्यांमध्ये दिसतो.
ओरहानचे टोपण नाव ‘ओरी’ आहे. सगळे त्याला प्रेमाने ओरी म्हणतात. ओरहानला पार्ट्यांचा शौक आहे आणि तो स्टार्ससोबत मोठ्या पार्ट्यांमध्ये दिसतो. ओरहान अनेकदा त्याच्या इन्स्टा हँडलवर स्टार किड्ससोबतचे फोटो शेअर करत असतो. सारा अली खानसोबतही तो अनेकदा दिसला आहे. याआधी ओरी सारा अली खानला डेट करत असल्याची बातमी आली होती, पण नंतर ओरीचे नाव जान्हवी कपूर आणि आता न्यासा देवगणसोबत जोडले जाऊ लागले.