बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित “राधे’ या सिनेमामधील पहिलं गाणं “सीटी मार’ प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात सलमान खानसोबत दिशा पटनी थिरकत आहे. सलमान खानने ट्विट करत “सीटी मार’ हे पहिलं गाणं शेअर आहे. या गाण्यामध्ये सलमान ब्लॅक टी शर्ट आणि लाल ब्लेझरमध्ये दिसत आहे, तर दिशा पांढरा टॉप आणि बॅगी डेनिममध्ये दिसत आहे.
सीटी मार हे गाणं शब्बीर अहमदने लिहिलं असून कमाल खान आणि लुलिया व्हेंतूर यांनी गायले आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाच्या निर्मात्यांकडून ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे यंदा हा सिनेमा थिएटरऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सलमानचा ओटीटीवर प्रदर्शित होणारा राधे हा पहिलाच सिनेमा आहे. 13 मे रोजी ईदच्या पार्श्वभूमीवर आता हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे.