मुंबई – सोशल मीडियावर नेहमीच मराठी अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ आपलं मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. सध्या हेमांगी एका नव्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. “बाई, बुब्स आणि ब्रा’ या कालच्या पोस्ट मुळे हेमांगी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
हेमांगीच्या या पोस्टला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अश्यातच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सुद्धा याच मुद्यावरून हेमांगीवर निशाणा साधला आहे. “इंदुरीकर महाराज कीर्तनातून महिलांविषयी बदनामीकारक वक्तव्य करत होते तेव्हा कुठे होता तुम्ही?
असा सवाल भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. हेमांगी कवी आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोडच्या विरोधात रान पेटवले तेव्हा कुठे होत्या? मला माहित नाही, असा टोलाही देसाईंनी लगावला.
काय होती हेमांगी कवीची पोस्ट…
“बाई, बुब्स आणि ब्रा…’
बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे (nipples, tits) आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा choice असू शकतो!
मग ती घरी असो किंवा social media वर किंवा कुठेही! हाँ त्यावरून judge करण्याचा, त्याबद्दल घाणेरडया चर्चा आणि gossip करण्याचा सुद्धा ज्याचा त्याचा choice!
पण यानिमित्ताने सांगावसं वाटतं…
ब्रा, ब्रेसीयर (अंतर्वस्त्रा)चा चार लोकांसमोर किंवा social media वर तरी येताना वापरण्याचा, न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रीच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या image चा जो काही संबंध जोडला जातो त्यासाठी स्त्रियांना त्यांच्याच शारीरिक स्वातंत्र्यासाठी अजून किती struggle करायचाय हे लक्षात येतं!
आणि गंमत म्हणजे या चर्चा करणाऱ्यांंमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त अग्रेसर असतात. पुरुष निदान त्याची मजा घेऊन गप्प बसतात पण स्त्रिया स्वतः त्यातून जात असताना ही खालच्या स्तराला जाऊन चर्चा करून कुठलं पदक मिळवतात कुणास ठाऊक!
Tshirt मधून पुरुषांची दिसणारी स्तनाग्रे किंवा for that matter कपड्यांमधून दिसणारा त्याचा कुठलाही अवयव किती natural पद्धतीने आपण पाहतो किंवा दुर्लक्ष करतो? सवयीचा भाग म्हणूनच ना! मग हेच स्त्रीच्या बाबतीत का घडू नये? पण मग आता सवय करून घ्यायला हवी…! या आशयाची पोस्ट हेमांगीने केली आहे.