Rohit Sharma On Retirement : कसोटी मालिकेत इंग्लंडला 4-1 ने पराभूत केल्यानंतर रोहित शर्मानेही आपल्या भविष्याबाबत मोठे विधान केले आहे. हिटमॅन 36 वर्षांचा झाला आहे, त्यामुळे प्रत्येक क्रिकेट चाहत्याला हे जाणून घ्यायचे आहे की रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कधी अलविदा करेल ? अर्थात रोहित कधी निवृत्ती घेणार ? असा सवाल अनेकांना पडलेला आहे. अशात धर्मशाला येथील शानदार विजयानंतर या मोठ्या प्रश्नाचे उत्तर खुद्द रोहितने दिले आहे. | Rohit Sharma On Retirement
पाचव्या कसोटीतील विजयानंतर निवृत्तीच्या प्रश्नावर बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “मी नेहमीप्रमाणे झोपेतून उठल्यावर मला जर त्या दिवशी वाटले कि मी क्रिकेट खेळण्यासाठी अनफिट आहे. अशा परिस्थितीत, मी त्यांना ( टीम मॅनेजमेंटला ) विचारेन आणि त्यांना याबद्दल सांगेन. मात्र, खरे सांगायचे तर, गेल्या दोन-तीन वर्षांत माझे क्रिकेट खूप चांगले झाले आहे आणि मी सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहे.” असं रोहित यावेळी म्हणाला. | Rohit Sharma On Retirement
यशस्वीच्या परफॉर्मन्सवर केलं भाष्य
या मालिकेत भरपूर धावा करणाऱ्या यशस्वी जैस्वालचेही हिटमॅनने कौतुक केले. तो म्हणाला, “यशस्वी जैस्वालला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. जेव्हा एखाद्या खेळाडूमध्ये एवढी प्रतिभा असते की तो पहिल्याच चेंडूपासून गोलंदाजावर दडपण आणू शकतो, तेव्हा त्याला भविष्यात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. तो एक यंगस्टर आहे आणि त्याला आव्हान आवडते. साहजिकच ही मालिका त्याच्यासाठी सरप्राईझ ठरली. | Rohit Sharma On Retirement
विजयाबाबत रोहित म्हणाला ?
पाचव्या कसोटीत इंग्लंडला पराभूत केल्यानंतर कर्णधार रोहित म्हणाला, “जेव्हा तुम्ही असा कसोटी सामना जिंकता तेव्हा सर्व काही सुरळीत व्हायला हवे. या खेळाडूंचा अनुभव कमी असेल, पण त्यांनी भरपूर क्रिकेट खेळले आहे. “आणि मी इथे उभा राहिलो. या सर्वांनी दडपणाखाली चमकदार कामगिरी केल्याचे पाहिले. या विजयाचे श्रेय संपूर्ण संघाला जाते आणि ते पाहून खूप छान वाटते.” | Rohit Sharma On Retirement