Farmer Success Story : अनेक राज्यामध्ये मक्याचे पीक सर्रास पद्धतीने घेतले जाते. याचे कारणही अगदी सोपे आहे. अवघ्या तीन महिन्यात मक्याचे पीक येते. कणसांसोबत मक्याची ताट जनावरांना खाण्यासाठी देखील उपयोगात येतात. मात्र आता एका शेतकऱ्याने मक्याच्या कणसांपासून निघणारी जी वेस्ट जाणारी टरफल आहेत त्यापासून थेट प्रोडक्ट निर्मिती करायला सुरुवात केली आहे. ज्यामुळे मक्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा आता चांगलाच फायदा होणार आहे. | product from corn west
बिहारमधील मुझफ्फरपूरचे रहिवासी इंजिनिअर मोहम्मद नाज ओझैर यांना मक्याच्या सालीपासून बनवलेल्या उत्पादनाचे पेटंट मिळाले आहे. गेल्या महिन्यात त्यांना भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून मक्याच्या वेस्ट आवरानापासून प्लेट्स, वाट्या,पिशव्या आणि इतर उत्पादने बनवण्याचे प्रमाणपत्र मिळाले. | product from corn west
भात आणि गव्हानंतर बिहारमध्ये जर तिसरे पीक सर्वात जास्त घेतले जात असेल तर ते मका आहे. राज्याच्या मक्याला देशासह जगातील अनेक देशांमध्ये मागणी आहे. मात्र आता राज्यातील मक्याच्या वेस्टपासून बनवलेल्या उत्पादनांची मागणीही वाढणार आहे.
मुझफ्फरपूर जिल्ह्यातील मुरादपूर गावातील रहिवासी मोहम्मद नाज ओझैर सांगतात की, एम.टेकचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी हैदराबादमधील अभियांत्रिकी महाविद्यालयात चांगली पगाराची नोकरी सोडली आणि गेल्या आठ वर्षांपासून ते गावात राहत आहेत. इथे आल्यानंतर काहीतरी वेगळं करण्याच्या इच्छेने कॉर्नच्या सालीपासून पदार्थ बनवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. याबाबत त्यांना 21 फेब्रुवारी 2024 रोजी भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून प्रमाणपत्र देखील प्राप्त झाले. | product from corn west
नोकरी सोडल्याने गावकरी हिणवायचे
हैदराबादमधील अभियांत्रिकी महाविद्यालय ज्यामध्ये मोहम्मद नाझ ओझैर यांनी एम.टेक केले. त्याच कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून सहा महिने काम केले. पण काहीतरी वेगळं करण्याच्या इच्छेपोटी ते 2016 मध्ये गावात परतले. जिथे त्यांनी पाहिले की लोक मक्याचा वापर करतात. पण त्याची साल निरुपयोगी मानून फेकून देतात. त्यानंतर मोहम्मद नाज यांनी यापासून वेगळे उत्पादन बनवण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद नाज ओझैर सांगतात की, मक्यापूर्वी त्यांनी पपई, केळी आणि बांबूच्या पानांपासूनही उत्पादने बनवली होती, मात्र त्यात त्यांना फारसे यश मिळाले नाही.
ते पुढे सांगतात की जेव्हा ते गावकरी आणि कुटुंबीयांशी मक्याच्या वेस्टपासून उत्पादने बनवण्याबद्दल बोलायचा तेव्हा लोक त्यांना वेडा म्हणून हिणवायाचे. गावातील लोक म्हणायचे त्याने चांगली पगाराची नोकरी सोडली आणि मक्याच्या कचऱ्याच्या नादी लागला. पण प्रबळ इच्छाशक्तीमुळे त्यांनी मक्याच्या वेस्टपासून पिशवी बनवली. त्यानंतर, प्लेट्स,वाट्या आणि इतर उत्पादने बनविली गेली. मार्च 2019 मध्ये पेटंटसाठी अर्ज केला. त्यानंतर या वर्षी फेब्रुवारीमध्ये वीस वर्षांसाठी पेटंट प्रमाणपत्र मिळाले. | product from corn west
उत्पादन वाढवून प्लास्टिकला देणार पर्याय
शेतकऱ्याशी संवाद साधताना नाज सांगतात की, त्यांनी आत्तापर्यंत चहाचे कप, प्लेट्स आणि मक्याच्या सालींसह दहा वेगवेगळ्या वस्तू बनवल्या आहेत. येत्या दहा वर्षांत मक्याच्या सालीपासून चॉकलेट्स बनवली जातील. कॉर्न पील रॅपर्स. बिस्किटे, साबण इत्यादीसह अनेक गोष्टी बनवल्या जातील. ते पुढे म्हणाले की, मक्याच्या प्लेट्स बनवण्यासाठी साधारण पाच ते सहा पाने लागतात. आगामी काळात मक्याच्या या वेस्टपासून अनेक उत्पादने बनवून प्लास्टिकला पर्याय देण्याचा प्रयत्न असलयाचे देखील यावेळी नाज यांनी स्पष्ट केले.