ऍडलेड: एखाद्या देशाचे पंतप्रधान कोणा दुसऱ्यासाठी पाणी घेऊन आले यावर विश्वास बसेल का. पण हे सत्य आहे. श्रीलंका संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे.
या दोन संघातील सराव सामन्यादरम्यान ड्रिंक्सब्रेक झाला तेव्हा चक्क ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन पंतप्रधान एकादश संघातील खेळाडुंसाठी पाणी घेऊन मैदानात आले. प्रेक्षकांनी त्यांच्या या कृतीचे टाळ्या वाजवुन अभिनंदन केले.
श्रीलंकेच्या डावातील सोळाव्या षटकात हे घडले. केवळ ऑस्ट्रेलियाच्याच नव्हे तर श्रीलंकेच्या फलंदाजांनी देखील आश्चर्य व्यक्त केले व पंतप्रधानांची प्रशंसा केली.
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटचा इतिहास पाहिला तर प्रतिस्पर्धी संघाला कोणतीही दयामाया दाखविली जात नाही. त्यांची मैदानावरील खुन्नस मैदानाबाहेर देखील अनेकदा दिसून आली आहे, त्यामुळे पंतप्रधानांची ही कृती अवघ्या क्रिकेट जगताच्या कौतुकाची गोष्ट ठरली.