Indian Premier League 2024 : आयपीएल स्पर्धेला लवकरच सुरुवात होत असून दिल्ली कॅपिटल्ससाठी एक आनंदाची बातमी बीसीसीआयने जाहीर केली. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतबातचे तंदुरुस्ती प्रमाणपत्र सादर केल्याने त्याला आयपीएल स्पर्धा खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यापूर्वी ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात निवडलेले नव्हते. कारण त्याचे तंदुरुस्ती प्रमाणपत्र त्यंना मिळाले नव्हते. मात्र, आता त्यांनी संघात पंतची निवड केली आहे. त्यामुळे तो दिल्लीकडून कर्णधारपद भुषवताना दिसेल. यंदाच्या आयपीएल स्पर्धेची सुरूवात येत्या २२ मार्चपासून होणार आहे.
पंत सध्या आयपीएल संदर्भातील काही जाहिरातींचे चित्रिकरण करत आहे. तो काही दिवसातच दिल्लीत दाखल होणार असून दिल्लीचा संघ आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पहिला सामना विशाखापट्टणम येथे खेळणार आहे. आता पंत देखील संघासोबत तेथे रवाना होऊ शकतो.
IND vs ENG : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत विश्वविक्रम, पहिल्यांदाच मारले गेले इतके षटकार…
कर्णधारपदाबाबत संभ्रम
आयपीएलमध्ये पंत कोणत्या भूमिकेत असेल. कर्णधारपदही त्याच्याच कडे दिले जाणार का याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. मात्र दिल्ली कॅपिटल्सकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण दिल्ली संघ व्यवस्थापन पंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द लक्षात घेऊन त्याच्यावर कोणताही दबाव टाकणार नाही. पंत यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळण्याची शक्यता दिसत नाही. तो सुरूवातीला केवळ फलंदाज म्हणून संघात खेळेल.