मुंबई – जेष्ठ अभिनेते कबीर बेदी हे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. कबीर बेदी यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांमध्ये काम करून आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे, परंतु ते त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिले आहेत. सगळ्यात जास्त म्हणजे ते प्रकाशझोतात आला तेव्हा जेव्हा वयाच्या ७० व्या वर्षी त्याच्यापेक्षा ३० वर्षांनी लहान असलेल्या परवीन दुसांझशी त्यांनी लग्न केले. कबीर बेदी आणि परवीन दुसांज यांचा विवाह 15 जानेवारी 2016 रोजी झाला होता. आज त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कबीर बेदी आणि परवीन दुसांज यांची त्यांच्या पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंतची कहाणी जाणून घेऊया…
अभिनेता कबीर बेदीने चार लग्ने केली आहेत. त्यांची चौथी पत्नी परवीन दुसांज त्यांच्यापेक्षा 30 वर्षांनी लहान आहे. कबीरने 2016 मध्ये त्याच्या 70 व्या वाढदिवशी परवीन दुसांजशी लग्न केले. मॉडेल आणि अभिनेत्री असण्यासोबतच परवीन दुसांज टीव्ही प्रोड्युसर देखील आहे. लग्नापूर्वी परवीन अनेक वर्षे कबीर बेदीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. परवीन दुसांझ आणि कबीर बेदी खूप जवळचे मित्र होते. दोघेही 10 वर्षे एकमेकांना डेट करत होते.
कबीर बेदी यांची लंडनमध्ये एका नाटकादरम्यान परवीन दुसांज यांची पहिली भेट झाली होती. ही गोष्ट 17 वर्षांपूर्वीची 2005 ची आहे. कबीर हे नाटक सेंट्रल लंडनच्या शाफ्ट्सबरी थिएटरमध्ये करत होते. परवीन तिच्या मैत्रिणीसोबत ते पाहण्यासाठी आली होती. नंतर सर्वजण कबीरला भेटले आणि संभाषणात परवीन कबीर बेदीकडे आकर्षित झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. परवीनचे कुटुंबीय कबीरसोबत लग्न करण्यास तयार नव्हते, पण नंतर सर्वांनी होकार दिला.