Lok Sabha Election 2024| देशभरात लोकसभेच्या एकुण 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी विविध राज्यांतील 102 जागांसाठी मतदान होणार आहे. 17 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 20 मार्चपासून सुरू झाली आहे. या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27 मार्च आहे.
भारतीय निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, उमेदवारी अर्जांची छाननी 28 मार्च रोजी होणार असून 30 मार्चपर्यंत उमेदवारांना त्यांची नावे मागे घेता येणार आहेत. मात्र, बिहारमध्ये होळी असल्याने 28 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. तर बिहार राज्यातील उमेदवारांसाठी 2 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागं घेण्याची तारीख असणार आहे.
सुधीर मुनगंटीवार आज भरणार उमेदवारी अर्ज Lok Sabha Election 2024|
तर महाराष्ट्राचे वनमंत्री आणि चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार आज आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणार आहेत. अर्ज दाखल करताना मुनगंटीवारांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी राज्यात विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या 5 जागांवर मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यात तामिळनाडूच्या सर्व 39 जागांवर मतदान होणार आहे. राजस्थानच्या 12, उत्तर प्रदेशच्या 8, मध्य प्रदेशच्या 6, आसामच्या 5, उत्तराखंडच्या 5, महाराष्ट्राच्या 5, बिहारच्या 4, पश्चिम बंगालमधील 4, अरुणाचल प्रदेशातील 2, मणिपूरमधील 2 आणि मेघालयातील 2 जागांवर मतदान होणार आहे. याशिवाय मिझोराम, नागालँड, अंदमान-निकोबार, जम्मू-काश्मीर, लक्षद्वीप, पुद्दुचेरी, सिक्कीम, छत्तीसगड आणि त्रिपुरा येथे प्रत्येकी एका जागेवर मतदान होणार आहे.
दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक असे असेल Lok Sabha Election 2024|
दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची अधिसूचना 28 मार्च रोजी जारी केली जाणार आहे. या तारखेपासून नामांकन प्रक्रिया सुरू होईल. नामांकनाची अंतिम तारीख 4 एप्रिल आहे. उमेदवारी अर्जांची छाननी 5 एप्रिल रोजी होणार आहे. 8 एप्रिलपर्यंत उमेदवारांना नावे मागे घेता येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
हेही वाचा:
”श्रीकांत शिंदे विरोधात लढण्यास ठाकरे गटातील नेत्यांचा ‘नकार’ आता…”