अभिनेते प्रकाश राजने नुकतेच आपल्या बायकोसोबत पुन्हा एकदा विवाह केला आहे. याचे कारण म्हणजे त्यांचा मुलगा वेदांत. आपल्या लग्नाची अकरावी वेडिंग ऍनिवर्सरी त्यांनी खास
पद्धतीने साजरी केली आहे. त्यांच्या मुलाला त्यांचा विवाहसोहळा पाहायची फार इच्छा होती. या सेरेमनीचे काही फोटो त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत.
पोनी वर्मा आणि प्रकाश राज 24 ऑगस्ट 2010 रोजी विवाहबंधनात अडकले होते. प्रकाश राज यांचा हा दुसरा विवाह आहे. पहिला विवाह त्यांनी ललिता कुमारी यांच्यासोबत केला होता. पण काही कारणांमुळे दोघे विभक्त झाले होते.
आपल्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी आपल्या लग्नातील एक फोटोदेखील शेअर केला आहे. “आयुष्याच्या प्रवासात माझा साथी बनल्याबद्दल तुझे खूप खूप आभार’.
अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना पोनी प्रकाश राज हिच्यासाठी व्यक्त केल्या आहेत. आगामी “केजीएफ चॅप्टर टू’मध्ये प्रकाश राज एका महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसून येणार आहेत.