35 अपंगांना व्हीलचेअरचे वाटप

भोसरी – रिलीफ फंड चॅरिटेबल फाउंडेशन ऑफ इंडिया व मिम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील अपंग असलेल्या लहान मुले-मुली, महिला ज्येष्ठ नागरिक अशा एकूण 35 गरीब गरजू अपंग व्यक्तींना व्हीलचेअरचे मोफत वाटप करण्यात आले.

नेहरूनगर येथे झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रिलीफ फंड चॅरिटेबल फाउंडेशन ऑफ इंडिया ऑफ इंडिया महाराष्ट्राचे व्यवस्थापक हाजी अब्दुल रशीद, माजी महापौर हनुमंतराव भोसले, माजी महापौर, नगरसेविका डॉ.वैशाली घोडेकर लोंढे, नगरसेवक राहुल भोसले, चिखली पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक फारुक सोलापूरे, सुहैर हुसैन, व्ही.एम.कबीर, कब्रस्तान ईदगहा कमिटीचे संस्थापक ए.बी. शेख, नजीर तराजगार, आरपीआयचे अल्पसंख्याक विभागाच्या शहराध्यक्ष अल्ताफ शेख, फारूक इनामदार, ईश्‍वर कांबळे, ख्वाजाभाई कुरेशी, युसुफ कुरेशी, गुलाम शहा आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शफाकत मारुफ, आसिफ सय्यद, कासिम सय्यद, मौला शेख, आयतूल्ला सय्यद, मुजबर अली शेख, फिरोज अन्सारी, मौलाना निजामुद्दीन, फिरोज पठाण, इरफान सय्यद, अमजद इनामदार, नासिर कुरेशी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शशिकांत नाईकरे, पत्रकार जमीर सययद, बी.के चौधरी आदी उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×