व्हॉट्सऍप बिझनेस ऍपमध्ये लवकरच एक नवीन फीचर येणार आहे. या आगामी फीचरची बीटा आवृत्तीवर चाचणी केली जात आहे. नवीन फीचरचे नाव क्विकली (quickly)आहे, जे तुम्हाला बिजनेस अकाऊंटच्या कोणत्याही मेसेजला जलदपणे उत्तर देईल. रिपोर्टनुसार, Android आणि iOS च्या काही बीटा वापरकर्त्यांना Quick Reply चे शॉर्टकट फीचर मिळत आहे. तसे तर ‘क्विक रिप्लाय’ हे फीचर व्हॉट्सऍप बिझनेस ऍपमध्ये खूप पूर्वीपासून आहे, जे कीबोर्डवर ‘/’ दाबून सक्रिय केले जाऊ शकते.
WABetaInfo ने व्हॉट्सऍप बिझनेस ऍपच्या या नवीन फीचरची माहिती दिली आहे. नवीन शॉर्टकट बटण चॅट शेअर ऍक्शन मेनूमध्ये आढळेल. या नवीन फीचरचे अपडेट सर्वांसाठी केव्हा जारी केले जाईल याबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही. 2019 पासून व्हॉट्सऍप बिझनेस ऍपमध्ये सिंगल बटणाद्वारे क्विक रिप्लाय हे फिचर आहे. प्रथम ते ऍपसाठी रिलीज करण्यात आले आणि नंतर ते व्हॉट्सऍप वेबसाठी रिलीज करण्यात आले.
या महिन्याच्या सुरुवातीला, अशा बातम्या आल्या होत्या की व्हॉट्सऍप इन-ऍप कॅमेरा इंटरफेसवर काम करत आहे. नवीन अपडेटनंतर, कॅमेरा आयकॉनचे स्थान बदलेल आणि इंटरफेस देखील बदलेल. कॅमेरा आयकॉनची रचना देखील बदलेल. याशिवाय एक नवीन अपडेट देखील येत आहे, ज्यानंतर व्हॉट्सऍप ग्रुपचे ऍडमिन प्रत्येकासाठी सदस्यांचा मेसेज डिलीट करू शकतील.
व्हॉट्सऍप ‘अनडू’ फीचरवरही काम करत आहे. Undo फीचरच्या मदतीने यूजर्स चुकून पोस्ट केलेले स्टेटस डिलीट करू शकतील. नवीन फीचरची चाचणी iOS ऍपच्या 2.21.240.17 आवृत्तीवर देखील केली जात आहे. नवीन अपडेटनंतर, वापरकर्त्यांना “Undo” चा पर्याय मिळेल जो स्टेटस अपडेट केल्यानंतर दिसेल, जरी Undo चा पर्याय उपलब्ध असला तरी स्टेटस अपडेट नंतर काही सेकंदापर्यंतच ते मिळेल.