काय चालंय काय..! एकीकडे अभिनेता रुग्णालयात, तर दुसरीकडे सेटवर ४५ जण पॉझिटिव्ह

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा आगामी “राम सेतू’ हा चित्रपट खूपच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला काहीदिवसांपूर्वी अक्षय कुमार उत्तर प्रदेशला दाखल झाला होता. मात्र, यावेळी अक्षयचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर एक खळबळ उडाली. आता अक्षय पाठोपाठ ‘राम सेतू’ चित्रपटाच्या सेटवरील तब्बल ४५ जणांना करोनची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्या तरी या चित्रपटाचे शूटिंग थांबविण्यात आले आहे.

‘राम सेतू’ चित्रपटाचं मुंबईतील मड आयलंड येथे चित्रीकरण सुरू होतं. चित्रीकरणासाठी जवळपास १०० ज्युनिअर आर्टिस्ट रविवारी सेटवर येणार होते. पण चित्रपटाचे निर्माते विक्रम मल्होत्रा यांनी करोना चाचणी करणं बंधनकारक केल्यानं यावेळी प्रत्येकाची चाचणी घेण्यात आली आणि यात ४५ जण करोना पॉझिटिव्ह सापडले.

तसेच आता मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता अक्षय कुमार यालाही पुढील उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. राम सेतू चित्रपटात अक्षय कुमार सोबत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि अभिनेत्री नुसरत भरूचा मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.