कार खरेदी करण्यासाठी कर्ज घेता येते, पण अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की सेकंड हँड कार घेण्यासाठीही कर्ज घेता येईल का? तर उत्तर होय आहे. जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला कार घ्यायची असेल तर तुम्ही त्यासाठी कर्ज घेऊ शकता. भारतातील अनेक बँका जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक इत्यादी आणि इतर वित्त कंपन्या अशी कर्जे देतात. सेकंड हँड कार घेण्यापूर्वी कारची संपूर्ण माहिती घ्यावी. तुम्ही खरेदी केलेली वापरलेली कार कर्जासाठी पात्र आहे की नाही हे देखील तुम्ही शोधून काढले पाहिजे. काही ठिकाणी तीन वर्षांपेक्षा जुन्या कारसाठी कर्ज देत नाहीत. चला तर, आज जाणून घेऊया की, दुसरी तुम्ही सेकंडहँड गाडीसाठी कर्ज कसे घेऊ शकता? त्याची नेमकी प्रक्रिया काय आहे?
१. बँकेशी संपर्क साधावा लागेल
तुम्ही सेकंड हँड कार कर्जासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्जासाठी तुम्ही बँकेच्या वेबसाइटला भेट देऊ शकता. त्याच वेळी, ऑफलाइन अर्जासाठी, तुम्हाला बँकेच्या शाखेत जावे लागेल. युज्ड कार लोनसाठी तुम्ही ऑनलाइन मार्केटप्लेसवर वेगवेगळ्या बँकांचे सौदे तपासावेत. तसेच तुमच्या सोयीनुसार कर्ज घेण्यासाठी बँक तुम्हाला किती कर्ज द्यायला तयार आहे हेही पाहावे. फक्त निवडक बँका तसेच संस्था तुम्हाला 100% कर्ज देतात. परंतु, बहुतेकजण फक्त 80 टक्के कर्ज देतात.
२. कारसाठी नेमके कर्ज निश्चित करा
यासाठी, तुम्ही तुमच्या कर्जदात्याशी कर्जाच्या तपशिलांची चर्चा करावी ज्यासाठी तुम्ही पात्र आहात. तसेच त्याची प्रक्रिया शुल्क, व्याजाचा दर, तुम्हाला किती कालावधीसाठी कर्ज हवे आहे आणि ईएमआय काय असेल इ.
३. कोणती कागदपत्रे आवश्यक असतील?
यासाठी तुम्हाला अनेक कागदपत्रांची आवश्यकता असेल. ज्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, ३ पासपोर्ट आकाराच्या फोटोंसह स्वाक्षरी केलेला अर्ज, रहिवासी पुराव्यासाठी पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पोस्टपेड युटिलिटी बिल (गॅस किंवा वीज बिल), अपडेट केलेले पासबुक किंवा बँक खाते स्टेटमेंट, नोंदणीकृत भाडे करार इ. जर अर्जदार पगारदार असेल, तर मागील 3 महिन्यांची पगार स्लिप, फॉर्म 16 किंवा आयकर रिटर्नची कागदपत्रे लागतात. जर अर्जदाराचा स्वतंत्र व्यवसाय असेल तर मागील दोन वर्षांचा ताळेबंद, व्यवसायाच्या पुराव्यासाठी नोंदणी प्रमाणपत्र, सेवा कर नोंदणी, मागील दोन वर्षांचे आयटीआर, आयटी मूल्यांकन/क्लिअरन्स प्रमाणपत्र, आयकर चलन/टीडीएस प्रमाणपत्र/फॉर्म २६ AS आवश्यक असेल.
४. ताबा कसा मिळवायचा?
तुमच्या कर्जाची रक्कम मंजूर झाल्यावर, विक्रेत्याच्या खात्यात पैसे जमा होतील. तुम्ही विक्रेत्याला डाउन पेमेंट करू शकता. यानंतर तुम्ही वापरलेल्या कारचा ताबा घेऊ शकता.