पिंपरी, (प्रतिनिधी) – कर्ज व व्याज वसुलीसाठी होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून 50 वर्षीय नागरिकाने विषारी औषध पिऊन आपले आयुष्य संपवले आहे. ही घटना 12 मार्च 2024 रोजी शाहूनगर, चिंचवड येथे घडली.
राजेंद्र किसन कदम (वय 50) असे मयत नागरिकाचे नाव आहे. याबाबत त्यांच्या पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून राजू शंकर, संजय शेलार, शाम तेलगू, रमेश औताडे, शाम हुज्जी, संतोष गायकवाड, चऱ्हाटे अशा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने फिर्यादीचा फ्लॅट नावावर करून घेतला. पुढे व्याजाच्या पैशासाठी सतत तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ केला. हा छळ 2014 ते 12 मार्च 2024 या काळात सुरू होता. त्यांच्या या छळाला कंटाळून कदम यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.