जे पक्ष सांभाळू शकत नाहीत ते देश काय सांभाळणार

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करताना मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. “पाच वर्षे चांगले काम करूनही काही लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जनतेनेच ठरवले आहे की मोदींना कोणीही दुसरा पर्याय नाही. जर राहुल गांधी काँग्रेस सांभाळू शकले नाहीत, तर देश कसा सांभाळणार? याची परिणीती अमेठीमध्ये हरण्यामध्ये झाली, असे आठवले यांनी म्हटले आहे.

दरम्यान महाराष्ट्रत विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून आठवले यांनी महायुतीसोबत असल्याचे सांगताना 240 जागांवर युती जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. तसेच 288 पैकी 40 जागा आरपीआयला देण्याची मागणीही केली होती. परंतु सध्याची परिस्थिती पाहता युतीच्या एकूण मित्र पक्षांना देखील 40 जागा मिळतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र, लोकसभेला अपयशाचा सामना करावा लागल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच राहुल गांधी यांना त्यांच्या परंपरागत मतदारसंघ अमेठीमध्ये हार पत्करावी लागली होती. यावरून आठवले यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.