पुणे – राज्यातून नैऋत्य मान्सून या आठवड्याच्या शेवटी माघारी फिरण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून महाराष्ट्रातून एक्झिट घेण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, यावर्षी पावसाने ओढ दिली होती. मात्र सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सर्वदूर झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागातील बहुतांश धरणे 100 टक्के भरली आहे. मात्र मराठवाड्यातील धरणे 50 टक्क्यांपेक्षा कमीच आहेत. जाणून घेऊन राज्यातील महत्वाच्या 45 धरणांत किती आहे पाणीसाठा…
राज्यातील महत्वाच्या धरणांतील पाणीसाठा (दि. 2 ऑक्टोबर 2023)
पुणे विभाग –
टेमघर धरण – क्षमता 3.71 टीएमसी – उपयुक्त पाणीसाठा 2.95 टीएमसी – 79 टक्के
वरसगाव धरण – क्षमता 12.82 टीएमसी – उपयुक्त पाणीसाठा 100 टक्के
पानशेत धरण – क्षमता 10.65 टीएमसी – उपयुक्त पाणीसाठा 100 टक्के
खडकवासला – क्षमता 1.97 टीएमसी – उपयुक्त पाणीसाठा 100 टक्के
पवना – क्षमता 8.51 – उपयुक्त पाणीसाठा 100 टक्के
मुळशी धरण – क्षमता 18.46 टीएमसी – उपयुक्त पाणीसाठा 99 टक्के
चासकमान – क्षमता 7.58 टीएमसी – उपयुक्त पाणीसाठा 100 टक्के
भामा आसखेड – क्षमता 7.66 – उपयुक्त पाणीसाठा 100 टक्के
भाटघर – क्षमता 23.50 टीएमसी – उपयुक्त पाणीसाठा 99 टक्के
नीरा देवघर – क्षमता 11.72 टीएमसी – उपयुक्त पाणीसाठा 100 टक्के
माणिकडोह धरण – क्षमता 10.17 टीएमसी – उपयुक्त पाणीसाठा 79 टक्के
डिंभे धरण – क्षमता 12.49 – उपयुक्त पाणीसाठा 100 टक्के
घोड धरण – क्षमता 5.47 टीएमसी – उपयुक्त पाणीसाठा 100 टक्के
उजनी – क्षमता 117.21 टीएमसी – उपयुक्त पाणीसाठा 41 टक्के
धोम – क्षमता 11.69 टीएमसी – उपयुक्त पाणीसाठा 73 टक्के
कण्हेर – क्षमता 9.59 – उपयुक्त पाणीसाठा 80 टक्के
उमरोडी – क्षमता 9.65 – उपयुक्त पाणीसाठा 56 टक्के
कोयना – क्षमता 105.24 टीएमसी – उपयुक्त पाणीसाठा 88 टक्के
वारणा – क्षमता 27.55 – उपयुक्त पाणीसाठा 101 टक्के
राधानगरी – क्षमता 7.77 – उपयुक्त पाणीसाठा 98 टक्के
दूधगंगा धरण – क्षमता 23.97 टीएमसी – उपयुक्त पाणीसाठा 96 टक्के
*मराठवाडा विभाग –
जायकवाडी धरण – क्षमता 102.67 टीएमसी – उपयुक्त पाणीसाठा 46 टक्के
निम्न दुधना – क्षमता 8.54 – उपयुक्त पाणीसाठा 28 टक्के
मांजरा – क्षमता 6.25 – उपयुक्त पाणीसाठा 29 टक्के
माजलगाव धरण – क्षमता 10.98 टीएमसी – उपयुक्त पाणीसाठा 12 टक्के
पूर्णा येलदरी धरणा- क्षमता 28.60 – उपयुक्त पाणीसाठा 62 टक्के
*नाशिक विभाग –
निळवंडे धरण – क्षमता 8.19 टीएमसी – उपयुक्त पाणीसाठा 99 टक्के
भंडारदरा – क्षमता 10.73 – उपयुक्त पाणीसाठा – 100 टक्के
मुळा धरण – क्षमता 21.50 टीएमसी – उपयुक्त पाणीसाठा 86 टक्के
हतनूर – क्षमता 9 टीएमसी – उपयुक्त पाणीसाठा 92 टक्के
वाघूर – क्षमता 8.76 – उपयुक्त पाणीसाठा 100 टक्के
करंजवण – क्षमता 5.37 – उपयुक्त पाणीसाठा 100 टक्के
गंगापूर- क्षमता 5.61 – उपयुक्त पाणीसाठा 100 टक्के
गिरणा – क्षमता 18.50 टीएमसी – उपयुक्त पाणीसाठा 57 टक्के
दारणा – क्षमता 7.13 – उपयुक्त पाणीसाठा 100 टक्के
मुकणे – क्षमता 7.24 – उपयुक्त पाणीसाठा 94 टक्के
*अमरावती विभाग –
उर्ध्व वर्धा – क्षमता 19.91 – उपयुक्त पाणीसाठा 100 टक्के
अरूणावती – क्षमता 6 टीएमसी – उपयुक्त पाणीसाठा 100 टक्के
इसापूर – क्षमता 34.3 टीएमसी – उपयुक्त पाणीसाठा 84 टक्के
बेंबळा – क्षमता 6.49 – उपयुक्त पाणीसाठा 73 टक्के
*नागपूर विभाग –
गोसीखुर्द धरण – क्षमता 26.12 – उपयुक्त पाणीसाठा 71 टक्के
इटियाडोह धरण- क्षमता 11.23 टीएमसी – उपयुक्त पाणीसाठा 100 टक्के
सिरपूर धरण – क्षमता 5.65 – उपयुक्त पाणीसाठा 96 टक्के
कामठी खैरी धरण – क्षमता 5.1 टीएमसी – उपयुक्त पाणीसाठा 100 टक्के
तोतलाडोह – क्षमता 35.90 टीएमसी – उपयुक्त पाणीसाठा 100 टक्के