नवी दिल्ली – भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी यांची एक वेगळी प्रतिमा सर्वांसमोर येत आहे. भारत जोडो यात्रा ज्या ठिकाणी पोहचते त्या ठिकाणच्या प्रमुख स्थळांना राहुल गांधी भेट देतात आणि मीडियाशीही संवाद साधतात. याचदरम्यान भारत जोडो यात्रेतील राहुल गांधींचा टी शर्टवरील एक फोटो सध्या व्हायरल होतोय. यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत राहुल गांधींनी टी शर्टच्या आतमध्ये नेमकं काय घातलाय असा सवाल विचारायला सुरुवात केली आहे.
भारत जोडो यात्रेदरम्यान केवळ टी शर्टवर फिरणाऱ्या राहुल गांधींना ज्यावेळी मीडियाने विचारले की,तुम्हाला थंडी वाजत नाही का ? तुम्ही फक्त टी शर्ट का घालता.. हाच मुद्दा पकडत राहुल गांधी एका सभेत म्हणाले होते,मीडियावाले मला विचारतात तुम्हाला थंडी नाही वाजत का ? त्यावर मी त्यांना म्हंटल हाच प्रश्न तुम्ही इथल्या शेतकऱ्यांना,मजदुरांना का नाही विचारात. राहुल गांधींच्या हा विचाराची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. अशात राहुल गांधींचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. ज्यामध्ये त्यांनी टी शर्टच्या आतमध्ये काही तरी घातले असल्याचा दावा नेटकऱ्यांकडून केला जातोय.
राहुल गांधींची टी शर्टचे बटन लावण्याची पद्धत आणि त्यांच्या शर्टला पडलेल्या सुरकुत्या यामुळे मोदी समर्थकांनी ते शर्टच्या आतमध्ये थर्मल घालत असल्याचे देखील म्हंटले आहे. याच संदर्भातील काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरून आता राहून गांधींवर जोरदार टीका सुरु झाली आहे. अनेकांनी राहुल गांधींना फेक म्हंटल आहे.
Look at the shirt. Buttons of T shirts buttoned up.Look at his chest Ist the ghere some think thick inside. The wrinkles show there is something below. A thick shield.
Lease check @RahulGandhi May be another Faker . pic.twitter.com/jCgnpjVCUB
— Himanshu Jain (@HemanNamo) January 6, 2023
राहुल गांधींचे असे फोटो व्हायरल होत असताना काँग्रेस समर्थकांनी देखील अशा फोटोजला आणि कमेंटला सोशल मीडियावर रिप्ले द्यायला सुरुवात केल्याचे दिसून येते. यामुळे राहुल गांधी आणि नेटकऱ्यांमध्ये चांगलेच सोशल मीडिया वॉर सुरु झाल्याचे पाहायला मिळते. राहुल गांधींविषयी एवढा अभ्यास करण्यापेक्षा इतर गोष्टींकडे लक्ष द्या असं त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.