मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही फॅशन आणि स्टाईलची आयकॉन मानली जाते. 49 वर्षांची असूनही मलायकाने स्वतःला खूपच फिट ठेवले आहे. मलायका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते त्यामुळे दिवसेंदिवस तिचे फॅन्स देखील वाढत चालले आहेत. अभिनेत्री नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे बोल्ड आणि मादक फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. फॅन्स देखील या ग्लॅमर्स फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
मात्र, सध्या अभिनेत्री तिच्या नवीन शो ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या शो मुळे चांगलीच चर्चेत असल्याचं दिसून येत आहे. मलायकाला नेहमीच हटके काहीतरी करण्याची सवय आहे. मलायका नेहमी आपला वेगळा रुबाब सर्वांना दाखवून देत असते. या नव्या शोमध्ये देखील मलायका काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, बॉलिवूडची ही ग्लॅमर्स अभिनेत्री आज करोडो रूपयांची मालकीण आहे. मलायका अरोरा हिची संपत्ती ऐकून तुम्हाला धक्का बसेल. अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी घटस्फोट घेतल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. मात्र, घटस्फोट घेतल्यानंतरही मलायका अरोरा ही करोडो रूपयांची मालकीण आहे.
इतकेच नाहीतर मुंबईमधील अत्यंत महागड्या परिसरामध्ये मलायकाचे आलिशान घर आहे. मलायकाकडे महागड्या कार देखील आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार अभिनेत्रीची एकूण संपत्ती 98.8 कोटी आहे. मुंबईमध्ये मलायकाची स्वत:ची एक अपार्टमेंट देखील आहे. रेंज रोवर आणि BMW सारख्या कारचे कलेक्शन देखील मलायका अरोराकडे आहे.
मलायका अरोरा अनेकदा रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून देखील दिसते. या एका शोसाठी ती 6 ते 8 लाखांपर्यंत फी देखील घेते. बॉलिवूड मधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये मालयकाचा नंबर लागतो. हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मलायकाचा हा शो सुरु असून, मलायका यामध्ये आणखी काय काय गमती जमती करणार आहे, हे पाहणे महत्वाचे आहे.