सिडनी – ऑस्ट्रेलियाचा समुद्रकिनाऱ्यावर एक विचित्र आकाराचा जीव आढळला असून या जीवाचा आकार आणि प्रकार पाहून जीवशास्त्रज्ञ संशोधन करण्याच्या उद्देशाने उत्साहित झाले आहेत. हाताचे मोठे पंजे मोठ्या आकाराची कवटी शेपूट आणि लवचिक शरीराचा हा जीव समुद्रातून लाटांमुळे वाहत वाहत किनाऱ्यावर आला असावा अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
जीवशास्त्रज्ञांनी या अनोख्या जीवाचे नाव ब्रशटेल पॉसम असे ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाच्या कॉटन ट्री या प्रख्यात समुद्रकिनाऱ्यावर सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या काही लोकांना हा अनोखा जीव दिसला. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना कळवले इलेक्स टेन नावाच्या एका नागरिकाने या जिवाचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर प्रसारित केला.
हा प्राणी कोणता आहे याबाबत त्याने प्रश्न विचारले. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि त्याकडे संशोधक लोकांचेही लक्ष वेधले गेले. ऑस्ट्रेलियात जमिनीवर आढळणाऱ्या कांगारू सारखा साधारण आकार या जिवाचा असल्याने सर्व उत्सुक झाले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या समुद्र किनाऱ्यावर विचित्र जीव आढळण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही यापूर्वीही असे चित्रविचित्र आकाराचे प्राणी ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळले आहेत.