मुंबई – हा हल्ला करण्यापूर्वी चौघांनी सिल्वर ओक येथे रेकी केल्याचा संशय पोलिसांना आहे.सिल्वर ओक येथे हल्ला करण्याआधी 4 जण येवून गेले होते त्यांनी रेकी केली असावी असा संशय मुंबई पोलिसांना आहे. या चारही जणांना रात्री अटक करण्यात आली आहे. त्यांना देखील आज कोर्टात हजर करण्यात आले.
पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण मिळालं. कथित एसटी कर्मचाऱ्यांनी राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी धुडगूस घातला होता.
8 तारखेला दुपारी 3 वाजता आंदोलक सिल्व्हर ओक येथे जाणार आहेत हे पोलिसांना कळाले होते. पण 7 तारखेला गुणरत्न सदावर्ते यांनी भाषणात सिल्व्हर ओक येथे जाण्याचा उल्लेख केला होता. तेव्हाच आझाद मैदान येथे जे पोलिस उपस्थित होते त्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली होती तरी देखील शरद पवार यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला गेला नाही.
7 एप्रिल रोजी गुणरत्न सदावर्ते यांनी दिले होते चिथावणीखोर भाषण करून इशारा दिला होता. तसेच प्रसार माध्यमांशी बोलत असताना शरद पवारांच्या निवास स्थानी घुसून त्यांना जाब विचारणार असा इशारा गुणरत्न सदावर्तेंनी दिला होता.