मुंबई – साऊथ सुपरस्टार प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन यांचा आदिपुरुष हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंगही जोरदार झाली.
Special Hanuman Ji Seat.. #Adipurush pic.twitter.com/BsSSBLA0kW
— Christopher Kanagaraj (@Chrissuccess) June 15, 2023
अशात सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणि सिनेमागृहांची अनेक फोटो व्हायरल होत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी निर्मात्यांनी जाहीर केले होते की, प्रत्येक चित्रपटगृहात एक जागा हनुमानजींसाठी राखीव ठेवली जाईल. अशात अनेकांनी सीटचा फोटो शेअर केला आहे.
#JaiShriRam #JaiBajarangBali 🙏🙏🙏
#Adipurush https://t.co/IJ0f6RpNq4— #Adipurush 🇮🇳 (@rajeshnair06) June 16, 2023
कुठे हनुमानजींचे फोटो, मूर्ती तर कुठे कापड आणि फुले दिसतात. रामायणावर आधारित या चित्रपटाबद्दल खुपच आकर्षण होतं. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहातील अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
दरम्यान, ओम राऊत यांचा बहुप्रतिक्षित आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक खूप भावूक झाला आहे. त्यांनी 9 जून रोजी तिरुपती येथे ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात घोषणा केली.
Arya Vidya Mandir school, Mumbai, kids watching morning show of #Adipurush starting with Bajarang Bali sthapana#JaiShriRam 🙏🙏🙏#JaiBajarangBali 🙏🙏🙏#Adipurush pic.twitter.com/rUmTUDqgUV
— #Adipurush 🇮🇳 (@rajeshnair06) June 16, 2023
हनुमानजीसाठी प्रत्येक चित्रपटगृहात एक जागा रिक्त ठेवली जाईल. हे सांगताना ते भावुक झाले. ओम म्हणाले होते की, जिथे रामायणाचे पठण केले जाते, तिथे भगवान हनुमान नक्कीच पोहोचतात. हा आमचा विश्वास आहे. या विश्वासाचा सन्मान म्हणून, प्रत्येक थिएटरमध्ये एकही सीट विकली जाणार नाही. हे हनुमानजीसाठी असेल. त्याच्या या घोषणेने अनेक प्रेक्षक भावूकही झाले. आता सिनेमागृहातील हनुमानजींच्या आसनाचे फोटो व्हायरल झाले आहेत.