West Bengal Election | ममतांच्या समर्थनार्थ खासदार जया बच्चन प्रचाराच्या मैदानात; म्हणाल्या…

West Bengal Election – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक कार्यक्रम आठ टप्प्यांमध्ये पार पडणार असून आतापर्यंत दोन टप्प्यांतील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. राज्यात यंदा सत्ताधारी तृणमूल काँग्रेसपुढे भाजपने मोठं आव्हान उभा केलंय. भाजपने राज्यात आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस देखील निकराचा  लढा देत आहे. अशातच आज ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ आज समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार जया बच्चन प्रचाराच्या मैदानात उतरल्या.

यावेळी जया बच्चन यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना, “त्यांनी ममता बॅनर्जी यांचं डोकं फोडलं, पाय मोडला, पण ते त्यांची हिंमत आणि बंगालला जगात भारी बनवण्याचा संकल्प तोडू शकले नाहीत. मला विश्वास आहे की ममता बॅनर्जी जे ठरवतील ते करतीलच” असं वक्तव्य केलं.


दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी ममता बॅनर्जींच्या समर्थनार्थ प्रचाराच्या मैदानात उतरण्याबाबत जया बच्चन यांनी, “माझ्या पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मला तृणमूल काँग्रेसच्या समर्थनार्थ प्रचार करण्याबाबत विचारणा केली. मला ममता बॅनर्जी यांच्याबाबत आदर असून एक महिला  या सर्व अत्याचाराविरोधात एकटी लढत आहे.” असं सांगितलं.

राज्यात निवडणुकांचा तिसरा टप्पा उद्या (६ एप्रिल) पार पडणार आहे. यामध्ये ३१ विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होईल.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.