फ्रान्समधील चौकशीमुळं ‘चौकीदार ही चोर है’ सिद्ध झालं; नाना पटोलेंचा थेट मोदींवर हल्ला

मुंबई – राफेल विमान खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचे आरोप काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी सातत्याने केले. मात्र नरेंद्र मोदी सरकारने सतत खोटे कागदपत्र दाखवून आरोपांवर पांघरून घालण्याचं काम केलं आहे. त्यावेळी राहुल गांधी यांनी चौकीदारही चोर है अशी मोहीम चालवली होती. हा धागा पकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर कडाडून टीका केली आहे.

राफेल लढाऊ विमान खरेदी करारानंतर डसॉल्ट कंपनीने भारतीय मध्यस्थाला एक दशलक्ष युरोंची लाच दिल्याचे फ्रान्समध्ये सुरु असलेल्या चौकशीतून समोर आले आहे. यावरून ‘चौकीदार ही चोर है’ हे सिद्ध झाले आहे, अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.

भारत आणि फ्रान्समध्ये राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीबाबत २०१६ मध्ये करार झाला. या करारात डसॉल्टने भारतातील मध्यस्थाला एक दशलक्ष युरो एवढी रक्कम दिली. २०१७ मध्ये डसॉल्ट ग्रुपच्या बँक खात्यातून ‘गिफ्ट टू क्लाएंट’ म्हणून ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आली होती. फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी तपास संस्था AFA ने डसॉल्टच्या बँक खात्यांचे ऑडिट केल्यानंतर ही बाब समोर आली ल्याचे नाना पटोले यांनी सांगतिले.

 

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.