कोलकाता – पश्चिम बंगाल मधील कोलकाता मध्ये दोन मजली इमारत कोसळल्याची मोठी घटना घडली आहे. यामध्ये ढिगाऱ्याखाली दबून आईसह तीन वर्षाच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना कोलकाता मधील अहिरितोला भागात घडली आहे.
West Bengal: A three-year-old toddler and a woman died after a building collapsed at Ahiritola Street in Kolkata today. They were rescued from under the debris of the building but later succumbed to their injuries.
Visuals from the spot. pic.twitter.com/TYLiIYLquz
— ANI (@ANI) September 29, 2021
अहिरितोलामध्ये सकाळी-सकाळी एक इमारत कोसळली असून या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एक महिला व तिचे तीन वर्षाचे बाळ दबले गेले आहे. ज्यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्यामधून अन्य् चार लोकांना बाहेर काढण्यात आले असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना आज सकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी घडली आहे. मिळालेल्या माहिनुसार ही दोन मजली इमारत जीर्ण अवस्थेत होती. सकाळी-सकाळी या इमारतीचा एक भाग कोसळला यामध्ये इमारतीमधील एक कुटुंब दबले गेले. हा घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना देताच पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व बचावकार्य सुरु केले.