मुंबई – बाॅलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर सध्या प्रचंड अॅक्टीव असते. त्यावर अनेक फोटो, व्हीडियो शेअर करत असते. अनेक चाहते तिचे हे व्हीडियो पाहण्यासाठी आतूर असतात. मलायका अशी अभिनेत्री आहे जिने जणू आपल्या वाढत्या वयाला एखाद्या जादूच्या डब्बीत कैद केलंय आणि तारुण्याचं वरदान मिळवलं आहे.
मलायका तिच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या ड्रेसिंग सेन्स अनेक चाहत्यांना आवडतो. तिच्या चेहऱ्यावरील गुलाबी नूर आणि तिची चमचाणारी त्वचा तिच्या प्रत्येक स्टाइल आणि फोटोशूटसाठी चार चांद ठरतात. आज मालयकाचे वय 47 वर्षे आहे याचाच अर्थ 50च्या वाटचालीत सुद्धा तिने आपल्या कर्वी फिगरला अधिक जास्त ग्लॅमरस बनविले आहे.
मालयकाच्या हॉट आणि सेक्सी लूक पुढे आजच्या भल्या भल्या अभिनेत्री तिच्या समोर फिक्या वाटतात. म्हणूनच आताच्या मुलींसारखा छोटासा क्रॉप टॉप आणि स्टाइलिश जिन्स घालून ग्लोइंग स्किन फ्लॉन्ट करताना मलायका आपल्या दिसते. मालयकाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. फॅन्स सुद्धा तिच्या मादक अदांवर फिदा होत असतात.
स्कीन केअर पासून फिटनेस सिक्रेट्स पर्यंत सर्व काही मलायका आपल्या चाहत्यांशी शेअर करत असते. आणि हीच गोष्ट सर्वांना आवडते. व्हायरल होणाऱ्या अनेक फोटोंमध्ये तब्बल 47 वर्षांची असणारी ही अभिनेत्री 20शीतल्या तरुणीप्रमाणे वावरताना दिसत आहे. ते प्रचंड आत्मविश्वासाने.