पेठ – येथे श्रीमंत सरदार राउतराव ढमाले प्रतिष्ठान स्वराज्य रथ सोहळ्याचे पेठमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. नंतर या रथ सोहळ्याची पेठ बाजारपेठेतून स्वागत मिरवणूक काढण्यात आली. शिवकाळात मुळशी खोऱ्यात विखुरलेल्या ढमाले परिवारातील आद्य पुरुष राऊतराव ढमाले छत्रपतींचे निष्ठावंत सरदार होते.
कालानुरूप ढमाले परिवार पुणे जिल्ह्यात विखुरलेला गेला. पेठमध्ये आजही अनेक ढमाले कुटुंबे राहतात. या रथ सोहळ्यात आलेल्या सर्वांना पेठ ग्रामस्थ आणि ढमाले परिवारातर्फे नाश्ता, चहापाणी व्यवस्था करण्यात आली होते. शिवजयंतीनिमित्त पहाटेपासून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर हजारो शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन परतीच्या मार्गावर जात असताना परिसर दणाणून निघाला होता.
सर्वत्र शिवमय वातावरण व तरुणांच्या हातात भगवा झेंडा घेऊन रस्त्याने दौडताना दिसत होते. या प्रसंगी अशोक राक्षे, बाबाजी ढमाले, विशाल ढमाले, सुभाष ढमाले, संभाजी ढमाले, संदीप ढमाले, नीलेश ढमाले, दिंगाबर ढमाले उपस्थित होते.