‘हम होंगे कामयाब! बॉलिवूडकरांनी वाढविले इसरोचे मनोबल

श्रीहरीकोटा – चंद्रावर अंतराळ उतरवण्याच्या महत्त्वाकांक्षी “चांद्रयान-2’मोहिमेचे “विक्रम’ लॅंडर चंद्रावर उतरवण्याच्या काही मिनिटे आगोदर काही तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे “विक्रम’ लॅंडरकडून सिग्नल पाठवले जाणे थांबवले गेले. नियोजित वेळेच्या काही मिनिटे अगोदरपासून “विक्रम’ लॅंडरची स्थिती काय आहे, हे श्रीहरीकोटा येथील शास्त्रज्ञांना समजू शकले नव्हते. यामुळे शास्त्रज्ञ निराश झाले आहेत. या पार्श्वभूमीवर  भारतातील अनेक दिग्गज नेत्यासह बॉलिवूडनेही    शास्त्रज्ञांचा प्रोत्साहित करत ट्विट केले आहे.

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख यांनी म्हंटले कि, ‘हम होंगे कामयाब!!! भविष्य त्या लोकांचे सुंदर आहे जे आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवतात. आज आपण जे काही साध्य केले ते कुणापेक्षा कमी नाही, जय हिंद.चांद्रयान -२ अभियानाबद्दल इस्रोच्या टीमचे अभिनंदन आणि इस्रोचा अभिमान आहे..’

अनुपम खेर यांनी म्हंटले कि, ‘देशाला इस्रोचा अभिमान आहे. असे म्हणत हिंदी शेर लिहीत इसरोटीमचे कौतुक  ट्विटद्वारे केले आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.