आम्ही भारतविरोधी कोणतीही कारवाई करणार नाही

मलेशियन पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांचे स्पष्टीकरण

लॅंगकवी : मागील काही दिवसांपासून भारतविरोधी भूमिका घेत असलेले मलेशियन पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपण भारताविरूद्ध कोणत्याही प्रकारचा सूड उगवणार नाही. तसेच त्यासाठी भारतविरोधी कारवाईदेखील करणार नसल्याचे स्पष्टीकरण यावेळी त्यांनी दिले आहे.

खाद्यतेलाचा जगातील सर्वात मोठा खरेदीदार असलेल्या भारतने या महिन्यात मलेशियामधून तेल आयात थांबवले होते. महाथिर यांनी भारताच्या धोरणांच्या विरोधात हल्लेखोर भूमिका घेतल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. काश्‍मीर प्रकरणापासून ते नागरिकत्व कायद्यापर्यंत भारतावर कठोर टीका महाथिर यांनी केली आहे.

मलेशियाच्या लॅंगकवी येथे पत्रकारांशी बोलताना महाथिर म्हणाले, “भारताविरुद्ध सूड उगवण्यास आपण खूप लहान आहोत.तसेच या समस्येतून बाहेर पडण्यासाठी आम्हाला इतर पद्धती आणि साधन वापरावे लागतील असेही महाथिर यांनी यावेळी सांगितले.

तथापि, महाथिर यांनी सोमवारी पुन्हा एकदा नागरिकत्व कायद्याबद्दल बोलताना म्हटले, सुधारित नागरिकत्व कायदा हा पूर्णपणे अन्यायकारक आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांत मलेशियाकडून खाद्यतेल खरेदी करणारा भारत अव्वल खरेदीदार होता, परंतु आता मलेशियाला तेल विक्री करणे कठीण झाले आहे. मलेशियाच्या अर्थव्यवस्थेत तेल निर्यातीत महत्त्वपूर्ण भागीदारी आहे.

मलेशियन खाद्य तेलाच्या किंमती गेल्या आठवड्यात सुमारे 10 टक्‍क्‍यांनी घसरल्या आहेत, गेल्या 11 वर्षातील साप्ताहिक घसरण हीदेखील आहे. मलेशियानेही वादग्रस्त इस्लामिक धार्मिक नेते झाकीर नाईक यांचा कायम रहिवासी असलेला दर्जा रद्द करण्यास नकार दिला आहे. मलेशियाच्या या निर्णयामुळे भारतही नाराज आहे. झाकीर नाईक यांच्यावर भारतात द्वेषयुक्त भाषण आणि मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो मलेशियात राहत आहे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here