‘हमे चाहिये मोदी शाहीसे आझादी’; ‘का’ विरोधात डाव्या आघाडीची जोरदार निदर्शने

कोल्हापूर: देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर अनेक ठिकाणाहून विरोध होताना पाहायला मिळत आहे. जामिया मिलिया विद्यापीठासहा अनेक ठिकाणचे विद्यार्थीही या कड्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्याच पार्शवभूमीवर आज कोल्हापूर मध्ये या कायद्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला.  या वेळी ‘हमे चाहिये आझादी, मोदी शाही से आझादी, बेकारीसे आझादी’. अशा घोषणाही देण्यात आल्या आहेत.

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंद या विरोधात डाव्या आघाडीने काढलेल्या मोर्चात जोरदार निदर्शने केली आहेत. कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकांमध्ये डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत नागरिकत्व सुधारणा कायद्याचा निषेध केला आहे. केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा केल्या नंतर देशभर संपात व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने केलेल्या या कायद्याला विरोध करण्यासाठी कोल्हापुरात डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवत निदर्शने केलीत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.