क्रिकेट कसे खेळायचे ते आम्ही सांगू शकत नाही – सर्वोच्च न्यायालय

तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या याचीकेवर कोर्टाचा शेरा

नवी दिल्ली – तामिळनाडू प्रिमियर लीगमध्ये तामिळनाडूव्यतिरीक्त इतर राज्यांच्या खेळाडूंना खेळू देण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यासाठी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने (टीसीए) बीसीसीआय विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या याचीकेवरील सुनावनी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगीतले की, तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने या संदर्भात बीसीसीआयशी चर्चा करण्याचा सल्ला देत क्रिकेट कशा प्रकारे खेळायचे हे आम्ही ठरवू शकत नाही असा शेरा मारला आहे.

या संदर्भातील सुनावनी दरम्यान न्यायालयाने टीसीएचे वकील कपिल सिब्बल यांना सवाल केला की, त्यांनी बीसीसीआयकडे संबंधीत मागणी केली आहे का? जर केली नसेल तर कोर्टात येण्यापुर्वी त्यांनी या सम्दर्भात बीसीसीआयला विचारणा करावी. यावर सिब्बल यांनी बीसीसीआय टीसीएच्या मागणीवर कोणतीही प्रतिक्रीया देत नसल्याचे सांगितले होते. त्यावर बीसीसीआयचे वकील पराग त्रीपाठीयांनी सांगितले की, टीसीए

बीसीसीआयशी सहकार्याच्या भुमीकेत नसून त्यांनी बीसीसीआयच्या नियमावलीचा अवलंब देखील केला नसल्याचे त्रीपाठी यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.