चिंबळी – खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये शनिवारी (दि. 11) मोठ्या प्रमाणात कलिंगडाची आवक झाली. त्यास 30 रुपये किलो भाव मिळाला.
पालेभाज्यांच्या मार्केटमध्ये कोबी 25, गवार 80, गाजर 25, वांगी 70, टोमॅटो 40, मिरची 20, वाटाणा 30 रुपये किलो प्रमाणे भाव मिळाला. तर मेथीची जुडी 10, कोथींबीरीची जुडी 2 रुपये प्रमाणे विक्री झाल्याचे पालेभाज्याचे आडतदार नितीन काळोखे व हेमंत एरंडे यांनी सांगितले.