चिंबळी – खेड कृषी उत्पन्न बाजार समिती चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये नवरात्र उत्सवा निमित्ताने पालेभाज्या बाजारात रताळ्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली असल्याचे आडतदार रवींद्र बोराटे यांनी सांगितले.
नवरात्र उत्सवा निमित्त उपवास सुरू झाले असल्याने उपवासाची रताळ्याची मागणी वाढली असल्याने चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये शनिवारी (दि. 10) कोल्हापूर (मलकापूर) येथून रताळी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली असून 15 रूपये भावाने विक्री करण्यात आली असल्याचे बोराटे यांनी सांगितले.