ईरोड (तामिळनाडू) – तमिळनाडू राज्यात वस्त्रोद्योगासंबंधित उद्योजकांनी एक दिवसाचा संप केला. यामध्ये कापड उद्योगातील घाऊक, किरकोळ व्यापारी तसेच कापड तयार करणाऱ्या कारखान्यांचा समावेश आहे. आम्ही आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचा संप करीत आहोत. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आगामी काळामध्ये आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा या क्षेत्रातील उद्योजकांनी दिला आहे. या क्षेत्रावर अगोदर पाच टक्के जीएसटी होता तो वाढवून आता 12 टक्के करण्यात आला आहे.
या विरोधात टेक्सटाईल मर्चंट असोसिएशनने संपाची घोषणा केली होती. कापडाच्या धाग्यावरील जीएसटी वाढविल्यामुळे या क्षेत्रातील हातमाग विणकर, प्रिंटर आणि व्यापाऱ्यांच्या अर्थार्जनावर मोठा परिणाम झाला असल्याचे या संघटनेने म्हटले आहे आणि केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला मागण्याचे निवेदन दिले होते.
मात्र या निवेदनावर दोन्ही बाजूकडून कसलाही प्रतिसाद न आल्यामुळे आम्हाला संप करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. वाढविल्याबद्दल इतर राज्यातही असंतोष आहे आणि इतर राज्यातील उद्योजकांनी अर्थ मंत्रालयाला यासंदर्भात निवेदन दिले आहे. वाहन आणि रिएॅल्टी क्षेत्रातील उद्योजकांनी पोलादाचे दर कमी करण्याची आवश्यकता याअगोदर वेळोवेळी व्यक्त केले आहे. बऱ्याच विकासकांनी महाग पोलाद आणि सिमेंट मुळे घरांच्या किमती वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा या अगोदरच दिला आहे.