पुणे- शहरात उन्हाचा तडाखा वाढल्याने पाण्याची मागणी वाढलेली असतानाच महापालिकेकडून येत्या गुरूवारी (दि.24 मार्च) अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पालिकेकडून तातडीच्या देखभाल दुरुस्तीसाठी पर्वती, एसएनडीटी, चतु:शृंगी, वारजे व होळकर हे जलकेंद्र बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, दुसऱ्या दिवशी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपिंग): शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रोड परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, इंदिरानगर परिसर, कर्वेरस्ता ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज परिसर, सेमिनरी झोन वरील मीठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे नं 42, 46(कोंढवा खुर्द) इत्यादी परिसर, पर्वती टॅंकर भरणा केंद्र, पद्मावती टॅंकर भरणा केंद्र.
नवीन व जुने होळकर जलकेंद्र: विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, मुळा रोड, खडकी, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, हाय एक्स्प्लोझिव्ह फॅक्टरी, हरीगंगा सोसायटी आणि परिसर.
चतु:शृंगी/एसएनडीटी/वारजे जलकेंद्र परिसर : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतुःशृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक परिसर, किष्किंदानगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरूगणेशनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हायवे परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण केंद्र परिसर, औंध बावधन, सूस, सुतारवाडी, भुगाव रस्ता आणि परिसर.