पिंपरी – शहरामध्ये गेल्या दोन दिवसापासून पाऊस पडत आहे. 3 ऑगस्ट रोजीच भारतीय हवामान विभागाने शहराराला अतिवृष्टीचा इशारा दिला होत. महापालिका प्रशासनाने दोन दिवस उशिरानी जागृत होत नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
3 ते 6 ऑगस्ट या कालावधीमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाला सुरूवात झाली आहे. येत्या दोन दिवसांतही शहरामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे तसेच पाण्यातील कोणत्याही विद्युत खांबाला, ट्रान्सफार्मर, इलक्ट्रिकल डीबी बोर्ड याला स्पर्श करू नये. भुयारीमार्ग व अंडरपास सबवेमध्ये पाणी साचल्यास जाण्यास टाळावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.