वाघोली – वाघोली तालुका हवेली येथे भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली होती.
या कार्यक्रमानंतर आमदार रोहित पवार यांनी वाघोलीतील नुकताच प्रवेश झालेल्या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी वाघोली तालुका हवेली येथील भैरवनाथ हॉटेल ला भेट देत या ठिकाणी भेळ खाण्याचा आनंद लुटला यावेळी बरोबरच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नवनवीन घडामोडींच्या बाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्याने समाविष्ट झालेल्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते माणिकराव सातव पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ, दाभाडे, माजी उपसरपंच शांताराम कटके, माजी उपसरपंच कैलास सातव पाटील,माजी सरपंच शिवदास उबाळे, वाघोली च्या सरपंच वसुंधरा उबाळे, माजी उपसरपंच समीर भाडळे, उपसरपंच महेंद्र भाडळे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दत्तात्रय कटके, सोपान गोरे, गणेश सातव,भैरवनाथ हॉटेलचे सर्व शिंदे कुटुंब आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.