वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली येथील बाईफ रोडच्या संभाजीनगर परिसरामध्ये वास्तव्यास असणाऱ्या ३७ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या तिघांच्या केलेल्या कोरोना टेस्ट मध्ये पॉजिटिव्ह व्यक्तीची १६ वर्षाच्या मुलीचा रिपोर्ट बुधवारी (दि.२७) पॉजिटिव्ह आला आहे.
मुलीला पुढील उपचारासाठी पुणे शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. एका हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक असणाऱ्या मुलीच्या वडिलांवर देखील उपचार सुरु आहेत. बाईफ रोड परिसरात स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रशासन खबरदार घेत आहे. वाघोलीमध्ये आत्तापर्यंत कोरोनाचे १४ रुग्ण सापडले असून यापैकी ७ जण बरे होऊन घरी परतले आहेत.
सद्यस्थितीत ७ अॅकटीव रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अॅकटीव रुग्णांपैकी तिघांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून तिघेही लवकरच बरे होऊन घरी परतणार असल्याचे माजी उपसरपंच समीर भाडळे यांनी सांगितले आहे.