वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली येथील साईसत्यम परिसरामध्ये वास्तव्यास असणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. सदर व्यक्तीला कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आल्याने खाजगी लॅबमध्ये केलेल्या कोरोना टेस्टमध्ये रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे.
या व्यक्तीचा शासकीय कोविड सेंटरमध्ये देखील स्वॅब घेण्यात आला असून त्याचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. त्यास ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पॉजिटीव्ह सापडलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा भाऊ देखील कोरोना पॉजिटीव्ह आला होता, यशस्वी उपचारानंतर तो बरा होऊन घरी देखील परतला आहे. साई सत्यम परिसरात औषध फवारणी करून परिसर सील करण्यात आला आहे. वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.
वाघोलीत आत्तापर्यंत एकूण १८ कोरोनाचे रुग्ण सापडले असून यापैकी १३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर ५ रुग्ण अॅकटीव आहेत.