पिंपरी(प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात दापोडी येथील ५६ वर्षीय महिलेचा बुधवारी (दि. १०) मृत्यू झाला. रुग्णालयामध्ये करोना बाधित 6 रुग्णांची नव्याने भर पडली आहे. तर, करोनामुक्त झालेल्या पुण्यातील 4 रुग्णांना घरी सोडण्यात आले.
करोनाबाधित रुग्ण हे दापोडी, नवी सांगवी, कुसुरगाव (ता. जुन्नर), हिंगणे-सिंहगड रस्ता (पुणे) आदी परिसरातील आहेत. त्यामध्ये पाच पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. पुण्यातील ढोले पाटील रस्ता, मंगळवार पेठ, येरवडा आणि येथील चौघे रुग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना आज घरी सोडले.
रुग्णालयामध्ये सध्या 26 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 7 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. एकूण 40 जणांना आत्तापर्यंत उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर, एकूण 14 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.