मुंबई : राज्यात विधान परिषदेच्या दोन जागांवर आज महाविकास आघाडी आणि भाजप आमनेसामने उभे ठाकले आहेत. नागपूर आणि अकोला बुलढाणा वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.
नागपुरात काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदलल्याने भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचा पाठिंबा असलेले मंगेश देशमुख यांच्यात लढत होणार आहे. तर अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघात तीन वेळा विजय मिळवलेले शिवसेनेचे गोपीकिशन बजोरिया यांना भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी आव्हान दिले आहे. या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडी एकत्र आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना दोन्ही ठिकाणी होत आहे.
निवडणूक आयोगाने सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या, तर नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक होत आहे.
अकोला-वाशिम-बुलढाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत होत आहे. तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसला ऐनवेळी उमदेवार बदलण्याची नामुष्की आली आहे. छोटू भोयर यांच्या जागेवर आता अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा देण्यात आला आहे.