पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानेही पुढाकार घेतला आहे. विभागातील विविध आगारांत अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान जागृती मंचाच्या वतीने मतदान करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये मतदान जागृती करण्यासाठी विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये मतदार जागृती मंचाची स्थापना केली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातील दौंड, शिरूर मंचर व भोर आगार तसेच बारामती कार्यशाळा येथे मतदान जागृती मंचाच्यावतीने मतदान जनजागृती करण्यात आली.
यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानाची शपथ घेतली. कर्मचाऱ्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांना व मित्र परिवाराला मतदानाबाबत जागृत करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.