पिंपळे गुरव, (वार्ताहर) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा अंतर्गत मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी महापालिका मतदान क्षेत्रीय अधिकारी आणि थेरगाव करसंकलन कार्यालय निवडणूक विभागाच्या संयुक्त विद्यमाने बाबुराव घोलप विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांगवीमध्ये मतदान जनजागृती रॅली काढली.
यावेळी विद्यार्थ्यांनी मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो…, वोट देणे जाना है… देश को आगे बढाना है… अशा घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला. यावेळी दुतर्फा बाजूकडील नागरिक, व्यावसायिक, फळ, भाजी विक्रेते या मतदार लोकांना या रॅलीतून मतदान करण्यासाठी जागृती करण्यात येत होती. रॅलीमधील विद्यार्थी जनजागृती करीत असल्याचे पाहून मतदारांमध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला.
विद्यालयाच्या प्रांगणापासून रॅलीला सुरुवात झाली. फेमस चौक, शिवनेरी चौक, क्रांती चौक, कृष्णा चौक, साई चौक मार्गे पुन्हा विद्यालयाच्या प्रांगणात येऊन रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीमध्ये मतदार जनजागृती पथक प्रमुख राजाराम सरगर, समन्वयक वाल्मिक पवार,
सचिन लोखंडे, दीपक येन्नावार, विजय वाघमारे, सुरेश भाट आदी निवडणूक अधिकारी यांच्यासमवेत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सीमा भोसले, पर्यंवेक्षिका निवेदिता पोळ, संजय मेमाणे, भारती भागवत, मनिषा वळसे, वैशाली शिंदे, प्रज्ञा नाईक, प्रीती भुयार, मोहिनी रत्नपारखी, दिपाली पाटील, राधाचरण आवारी, महेंद्र भुजबळ, योगेश बुर्डे, साळुंखे सर, धुमाळ मॅडम रॅलीमध्ये सहभागी झाले होते.