नवी दिल्ली – आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संवादाच्या अनेक साधनांचा वापर माणसाकडून केला जातोय, मोबाईल फोन हे त्यापैकीच एक… आज हे साधन प्रत्येकाची गरज बनलं आहे. दरम्यान, तुम्ही सुद्धा नवीन मोबाइल घेण्याच्या विचारात असाल तर खालील बातमी नक्की वाचा…
नुकतंच व्हिवो या नामांकित मोबाईल कंपनीने आपला दमदार मिड बजेट रेंजचा व्हिवो व्हाय 20 (Vivo Y20) आणि व्हिवो व्हाय 20 आय (Vivo Y20i) हे दोन स्मार्ट फोन लॉन्च केले आहेत. या दोन्ही स्मार्ट फोनमध्ये केवळ रॅमचा फरक आहे. व्हिवो व्हाय 20 हा स्मार्टफोन 4 जीबी रॅमचा असून, व्हिवो व्हाय 20 आय मध्ये 3 जीबी रॅम देण्यात आला आहे.
व्हिवो व्हाय 20 हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंट या एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला असून याची किंमत 12 हजार 990 रुपये आहे. हा फोन ओब्सीडियन ब्लॅक आणि डॉन व्हाइट अश्या दोन आकर्षित रंगात उपलब्ध असेल. तसेच हे दोन्ही फोन अँड्रॉइडवर आधारित फन टच ओएस 10.5 वर कार्यरत असतील.
दुसरीकडे, व्हिवो व्हाय 20 आय हा स्मार्ट फोनही 3 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये आला आहे. याची किंमत 11 हजार 490 रुपये आहे. डॉन व्हाइट आणि नेब्युला ब्लू या 2 रंगात उपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे या दोन्ही फोनमध्ये 5 हजार एमएएच बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे.