बालाकोट एअर स्ट्राईकवरच्या सिनेमामध्ये विवेक ओबेरॉय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये काम केल्यानंतर विवेक ओबेरॉय आता बालाकोट एअर स्ट्राईकवरच्या सिनेमामध्ये काम करण्यासाठी सिद्ध झाला आहे. “बालाकोट : द ट्रू स्टोरी’ असे या सिनेमाचे नाव असणार आहे. जम्मू, काश्‍मीर, दिल्ली आणि आग्रामध्ये या सिनेमाचे शुटिंग होणार आहे. या वर्षाच्या अखेरीस या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होणार असून हिंदीबरोबरच तमिळ आणि तेलगूमध्येही तो तयार होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकला बॉक्‍स ऑफिसवर बऱ्यापैकी यश मिळाले होते. उमंग कुमारच्या दिग्दर्शनाखाली झालेल्या मोदींच्या बायोपिकवर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. निवडणूकीच्या पूर्वी रिलीज झाल्यास भाजपला त्याचा फायदा होईल असा दावा विरोधकांनी केला होता. सुमारे दशकभराचा ब्रेक घेतल्यानंतर या बायोपिकमधून विवेकने कमबॅक केले होते. आता “बालाकोट’च्या निमित्ताने विवेकला पुन्हा ऍक्‍शन रोल करण्याची संधी मिळाली आहे.

विकी कौशलने “उरी’मध्ये साकारलेल्या रोलसारखाच लिडींग रोल “बालाकोट’मध्ये विवेक ओबेरॉयला मिळालेला असेल, अशी आशा करुयात. जर तसेच असेल तर “बालाकोट’ हा विवेकच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)